शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात धुलीवंदन साजरा, नैसर्गिक रंग लावीत युवकांनी दिल्या एकमेकांना शुभेच्छा-
सोयगाव प्रतिनिधी संतोष गर्दे
सोयगाव दि.14 – शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात धुलीवंदन सण साजरा करण्यात आला. सकाळपासून शहरात चिमुकल्यांसह,युवक व जेष्ठांनी धुलीवंदनास सुरुवात केली होती. चिमुकल्यांसह युवकांनी व जेष्ठांनी एकमेकांना नैसर्गिक रंग लावीत धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या.अलीकडे रासायनिक हानिकारक रंग व पाण्याचा अपव्यय करत होळी व रंगपंचमी साजरी करण्याकडे युवा व किशोरांचा कल वाढत चालला असून सर्व सण पर्यावरण पूरक, निसर्गाचा ऱ्हास न होता साजरे करण्यासाठी अनेक माध्यमे, संस्था,सामाजिक कार्यकर्ते कार्य करीत आहे.या आवाहनास प्रतिसाद देत शुक्रवारी धुलीवंदनाच्या दिवशी सकाळ पासूनच शहरात रंगोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली होती. चिमुकल्यांसह, तरुण व जेष्ठांनी सकाळपासून एकमेकांना रंग लावीत धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान तरुणांसह चिमुकल्यानी डीजेच्या तालावर थिरकत एकमेकांना रंगीबेरंगी रंगाने रंगवीत धुलिवंदन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहरात रस्त्याने रंगाचा सडा पडल्याने शहर मनमोहक दिसत होते. रासायनिक हानिकारक रंग व पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अमोल निकम,महेश मानकर,दत्तू रोकडे,राम सोहनी,भगवान कोथलकर,सुनील ठोंबरे,दिलीप शिंदे,अरुण सोहनी,योगेश बोखारे आदींनी पुढाकार घेतला होता.
