श्री संत तुकोबाराय वैकुंठ गमन सोहळा निमित्त वाको देते भागवत सप्ताहाचे आयोजन…
प्रतिनिधि संतोष गर्दे
पळसखेडा प्रतिनिधी… श्री संत जगद्गुरु तुकोबारा वैकुंठ गमन सोहळा निमित्त वाकोद येथे श्रीराम मंदिर समोर भव्य दिव्य हरिनाम कीर्तन सप्ताह सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आला .. यावेळी सकाळी पाच ते सहा काकडा नऊ ते बारा व दुपारी दोन ते पाच कथा संध्याकाळी पाच ते सहा हरिपाठ रात्री साडेआठ ते साडेदहा हरिकीर्तन असा कार्यक्रमाचा रूपरेषा असते… दररोज नवीन नवीन हरिभक्त परायण महाराज यांचे कीर्तन असते सर्व पंचक्रोशीतील भक्त समुदाय कीर्तनाचा आनंदात लाभ घेतात… व संध्याकाळी सकाळी भोजनाचा कार्यक्रमही असतो तसेच कथाकार हरिभक्त परायण महादेव महाराज निपाणा यांचे कथा वाचन खूप सुंदर असते. कथा ऐकण्यासाठी लागून लांबून लोक भक्त येत असतात… कथेची सांगता 17 मार्च सोमवार रोजी होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी काल्याच्या प्रसादाचा व कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन गावातील भक्त मंडळी करीत आहेत…
