जामनेरच्या पाच वर्षीय उम्मेअम्माराचा पहिला रोजा पुर्ण.

प्रतिनिधी संतोष गर्दे

मुस्लिम बांधवांच्या पवित्र अशा रमजान महिन्याला सुरुवात झाली असुन ईश्वराप्रती आपली श्रद्धा ठेऊन रोजे ( उपवास) ठेवले जातात. इस्लाममध्ये कलमा, नमाज, रोजा, जकात, हज हे पाच प्रमुख तत्व आहेत यात प्रत्येकाने रोजा ठेवणे बंधनकारक आहे. मोठ्यांसह लहान लहान मुले मुली सुद्धा रमजानचे उपवास करतात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असूनही एवढ्या रखरखत्या तापमानात सुद्धा शहरातील पाच वर्षीय उम्मेअम्मारा या बालिकेने हिने पहिला रोजा पुर्ण केला आहे. सकाळी पाच वाजे पासुन ते सायंकाळी सात वाजे पर्यंत अन्नाचा एक आणि पाणी न पिता उपाशी पोटी राहुन तीने अल्लाह ( ईश्वराप्रती) आपली श्रद्धा व्यक्त केली आहे.एवढ्या कमी वयात आपल्या जीवनाचा पहिला रोजा पुर्ण केल्याबद्दल आजी, आजोबा, आई, वडील, व नातेवाईक यांनी तिचे अभिनंदन करुन कौतुक केले आहे