सोयगाव तालुका..
प्रतिनिधी संतोष गर्दे
सोयगाव तालुक्यातील टिटवी पळसखेड शिवारामधील मोठ्या धरण क्षेत्रात साठवण तलावाचे नव्याने काम सुरू आहे या धरण क्षेत्रातील तलावामध्ये ज्या शेतकऱ्यांची शेत आधिग्रहण झाले आहे अशा आदिवासी शेतकऱ्यांची शेतीची साठवण तलाव मोजणी अधिकाऱ्यांनी चुकीची मोजणी करून गट क्रमांक 29 मध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव होते व ते शेत धरण क्षेत्रात अधिकरण करण्यात आले आहे त्याच शेतकऱ्यांचे नाव कमी करून त्यांची मोजणीच केली नाही अशी माहिती व तक्रार दिनांक 4 12 2024 रोजी उपविभागीय अधिकारी सिल्लोड येथे दिली आहे टिटवी पळसखेड शिवारामधील चालू असलेला साठवण तलावामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी असून सुद्धा त्यांना सातबारा यातून कमी करण्यात आले आहे त्या शेतीची खोटी मोजणी करून त्या आदिवासी शेतकऱ्यांना संबंधित कार्यालयाने शेती मोजणी मधून वगळण्यात आले आहे व ज्या शेतकऱ्यांच्या त्या क्षेत्रात जमिनीत नाही अशा शेतकऱ्यांच्या नावावर जमिनी दाखवण्यात आले आहे अशी माहिती टिटवी पळसखेड येथील आदिवासी शेतकऱ्यांनी दिली आहे तरी संबंधित कार्यालयाने गट क्रमांक 29 या संपूर्ण क्षेत्राची फेर मोजणी करण्यात यावी आणि उरलेली आमची जमीन आमच्या ताब्यात देण्यात यावी आमच्या जमिनीचा मोबदला आमच्याच नावावर देण्यात यावा या मध्ये जो कोणी भ्रष्टाचारी पुढारी अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावं व आम्हा आदिवासी शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी पिडीत आदिवासी शेतकरी करीत आहे

