छ.संभाजीनगर सोयगाव प्रतिनिधी संतोष गर्दे
दि. १७ आठवड्याचा पहिल्याच दिवशी दि. १७ सोमवार रोजी चार नायब तहसीलदारांसह ९ कर्मचारी गैरहजर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तहसीलदार यांचा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याने तहसिल चा कारभार अंशकालीन कर्मचारी, कोतवाल व संगणक चालक यांच्यावर अंवलबुन असल्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव तहसिल कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयात सकाळी ०९:४५ वाजता हजर राहणे बंधनकारक असतांना अधिकारी व कर्मचारी मनमानी करीत जेंव्हा वाटेल तेंव्हा येतात व जेंव्हा वाटेल तेंव्हा जातात. तहसीलदार यांचा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अंकुश राहिलेला नाही.आठवड्याचा पहिला दिवस दि. १७ सोमवार रोजी सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत नायब तहसीलदार व कर्मचारी तहसिल कार्यालयात आलेले नव्हते. मात्र ग्रामीण भागातून तहसीलच्या कामासाठी आलेले नागरिक उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते संदीप इंगळे यांनी तहसिल कार्यालयात नायब तहसीलदार व कर्मचारी वेळेवर हजर राहत नसल्याने त्यांच्या गैरहजरी टाकून त्यांची वेतन कपात करून कारवाई करावी अशी मागणीचे निवेदन दिले. आस्थापना विभागाकडून राजकुमार खेत्रे, आर. डी जाधव, सुरेश आल्हाड, संजय ताले, विजय उमाळकर, महेंद्र पवार, संतोष नवगिरे, संजय नावकर व गोविंद गोफणे यांची हजेरी रजिस्टर वर गैरहजरी लावण्यात आली. तर तहसीलदार मनीषा मेने या देखील आज कार्यालयात गैरहजर होत्या या संदर्भात विचारणा केली असता सर्वांनी मौन पाळले. तसेच नायब तहसीलदार संभाजी देशमुख ११:३०, व नायब तहसीलदार बहुरे ११:३० हे कार्यालयात आले तर नायब तहसीलदार पत्रिके व नायब तहसीलदार काकासाहेब सावळे हे गैरहजर होते. तहसीलदारच वेळेवर येत नसल्याने तहसिल कार्यालयात अधिकारी व कर्मचारी वेळेवर येत नसल्याने तहसिल कार्यालयात कामासाठी आलेल्या वयोवृद्ध महिला व नागरिकांना मोठा त्रास सहन करीत कामे होत नसल्याने आर्थिक भुदंड सोसत माघारी फिरावे लागत आहे. सोयगाव तालुका हा दुर्लक्षित असून मराठवाड्याची व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची हद्द असून जिल्हाधिकारी यांनी नागरिकांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी तहसिल कार्यालयात बायोमेट्रिक सुरू करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
- तहसीलदार मनीषा मेने यांनी सोयगाव तहसिल कार्यालयाचा पदभार स्विकारला तेंव्हा पासून दैनंदिन कामकाजासाठी दुपारी ०१:०० वाजेनंतर येत असल्याने गोरगरिबांच्या कामावर खीळ बसली आहे. शेतकरी व तहसिल कार्यालयात रेंगाळलेल्या कामासाठी ग्रामीण भागातून वयोवृद्ध महिला व नागरिक सकाळ पासूनच तहसिल कार्यालयात तहसीलदार व अधिकारी यांची देवासारखी वाट बघत असतात मात्र तहसीलदारांसह अधिकाऱ्यांना या गोष्टीचे गांभीर्य नसल्याने नागरिकांमधून तहसीलदार यांच्या मनमानी येणे – जाणे या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. पालकमंत्री तथा समाज कल्याण मंत्री ना. संजय शिरसाट यांनी लक्ष घालावे अशी मागणी जनतेकडून केली जात आहे. जाणून घेऊया संदीप इंगळे यांच्या प्रतिक्रिया
