धी.शेंदुर्णी एज्यु.को-ऑप सोसायटी संचलित,
आ.ग.र.गरूड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या शालेय प्रांगणात निरोप देण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दादासो संजयरावजी गरुड होते.प्रथमतःसदगुरू हरिप्रसाद महाराज आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड,अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड व विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.याप्रसंगी संस्थेचे सहसचिव दादासो.यु.यु.पाटील,प्रमुख पाहुणे नाना लामखेडे,गोविंदजी अग्रवाल, शेंदुर्णी आऊट पोस्टचे पोलीस निरीक्षक एन.बी.सिंब्रे साहेब,व्ही.पी.पाटील,डाॅ.किरण सुर्यवंशी,
पत्रकार युवराज सूर्यवंशी,ऍड.गणेश पारळकर,विद्यालय व कनिष्ठ महा.
मुख्याध्यापक आर एस चौधरी,पर्यवेक्षक विनोद पाटील,ज्येष्ठ शिक्षक भक्तराज कुमावत,पी.पी पाटील,एस.डी.सुरवाडे इत्यादी मान्यवर उपस्थितीतहोते.सुरुवातीला आर एस चौधरी यांनी,प्रास्ताविक केले.तद्नंतर प्रमुख पाहुणे व्ही पी पाटील यांनी विद्यार्थ्यांचे उद्बोधन करत आपल्या क्षमता वृंदि्गत करण्याचा सल्ला दिला,तसेच गोविंद अग्रवाल यांनीविद्यालय,महाविद्यालय
व गुरुजनांचे महत्त्व सांगत आम्ही आजच्या स्थितीला फक्त आणि फक्त विद्यालयामुळे आहोत असं त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले नंतर पोलीस निरीक्षक सिंब्रेसाहेब यांनी आपल्या मनोगतात वाहन कायदा विषयक माहिती दिली.लामखेडे सर यांचे मनोगत होऊन विद्यार्थी मनोगत मोहिनी चौधरी,दर्शना पाटील,आयुषी साळुंखे,नयन तुके या विद्यार्थ्यांनी केले तद्नंतर,कार्यक्रमा त संस्थेचे अध्यक्ष संजय दादा गरुड यांना ज्ञानमर्मी फाउंडेशन जळगाव यांच्याकडून जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाल्याने विद्यालयाच्या वतीने अभिनंदनपर पुष्पगुच्छ ट्रॉफी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला
तसेच गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव येथे सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थिनी यशस्वी ओव्हाळ या विद्यार्थिनीला देखील गौरविले.
तसेच विज्ञान शिक्षक पि.के.चौधरी यांचाही सत्कार विद्यालयाच्या वतीने करण्यात आला व यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यातआले.तदनंतद्नंतर
अध्यक्षीय मनोगतात संजय दादा गरुड यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत आई वडील व गुरुजनांचा सन्मान करण्याचा व आपल्या जीवनात यशस्वी होण्याचा सल्ला दिला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पी.जी.पाटील यांनी केले तर आभार पी.पी.पाटील यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



