छत्रपती संभाजीनगर BREAKING NEWS

सोयगाव:छत्रपती संतोष गर्दे uncut)soygaon

सोयगाव तालुक्यातील घोरकुंड गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावकरी हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकत आहे. तर दुसरीकडे गावच्या पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीचे पाणी शेतकरी शेतीसाठी वापरत आहे. गावकऱ्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्यामुळे
तहसीलसमोर व पंचायत समिती समोर घोरकुंड येथील शेकडो महिलांनी हंडा मोर्चा काढत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे सोयगाव तालुक्यात वनगाव घोरकुंड ग्रुप ग्रामपंचायत आहे. घोरकुंड गावासाठी पाणीपुरवठा योजनेची विहीर ही गोंदेगाव शिवारातील नदीकाठी वसंत भिका पाटील यांच्या शेताजवळ असून त्यांच्या दोन्ही मुलांनी काही दिवसांपासून घोरकुंड

गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतून पाणी उपसा करण्यास अडथळा निर्माण केला आहे. त्यामुळे गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. घोरकुंड गावातील गंभीर पाणी टंचाईच्या समस्या विरोधात गावातील महिला एकवटल्या आहेत