धी. शेंदुर्णी एज्यु.को-ऑफ सोसायटी संचलित,
अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड व्यायाम शाळा व सुसज्ज जिमखान्यात अत्याधुनिक व्यायाम नवीन साहित्याचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उद्घाटक (पोलीस उपनिरीक्षक आऊट पोस्ट शेंदुर्णी नंदकुमार सिम्रे साहेब यांच्या हस्ते नविन व्यायाम साहित्याचे उद्घाटन झाले, या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती बापूसाहेब बीडे एम.एल. सी.सत्यजित दादा तांबे जामनेर पदवीधर तालुका प्रमुख,राहुल राय मुळे,आ.ग.र गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर एस चौधरी सर,परदेशी कॉन्स्टेबल, आचार्य गरुड प्राथमिक विद्यामंदिर शेंदुर्णी मुख्याध्यापिका सौदामिनी गरुड,
व्यायाम शाळेचे व्यवस्थापक सचिन सुर्वे,काटे सर, सचिन नाईक, योगेश पाटील, सोपान आप्पा, पंकज जैन,छोटू आप्पा,विजू आप्पा,या मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून बजरंग बलीच्या प्रतिमेचे व व्यायाम साहित्याचे पूजन व माल्यार्पण होऊन कार्यक्रम उद्घाटन सोहळा नंदकुमार सिम्रे यांच्या हस्ते पार पडला.
संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब संजय गरुड उप अध्यक्ष आबासो भि शा शेळके सचिव काका साहेब सागरमल जैन सह सचिव दादासाहेब यु यु पाटील कार्यालय सचिव भाऊ साहेब दिपक गरुड यांनी भ्रमनध्वनी द्वारे शुभेच्छा दिल्या.


