शेंदुर्णी ता.जामनेर
धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी शेंदुर्णीचे विद्यमान चेअरमन श्री संजय भास्करराव गरुड यांना पुणे व जळगाव येथील ग्राम गौरव मीडिया हाऊस चे विवेक ठाकरे यांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील बहुजन समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल ज्ञानमर्मी जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी विधानसभेचे माजी अध्यक्ष श्री अरुणभाई गुजराती, राहुरी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू बाळासाहेब मगर जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसादजी शर्मा ,आमदार मंगेशजी चव्हाण,जिल्हा परिषद जळगाव चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित साहेब,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाधिकारी तसेच जिल्हाभरातील प्रमुख संस्थांचे संस्थाचालक उपस्थित होते.सदर पुरस्कार श्री संजयदादा गरुड यांचे प्रतिनिधी म्हणून प्राध्यापक सुनील गरुड, प्राध्यापक किरण पाटील अविनाश भालेराव या प्रतिनिधींनी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान स्वीकारला.सदर पुरस्काराबद्दल शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री संजय भास्करराव गरुड यांनी ग्राम गौरव मीडिया हाऊस चे प्रमुख श्री विवेक ठाकरे यांचे आभार व्यक्त केले. तसेच श्री संजय भास्कर गरुड यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल संस्थेचे व्हाईस चेअरमन आबासाहेब भीमराव शामराव शेळके,सचिव सागरमल जैन ,सह सचिव उत्तमसिंग उमेदसिंग पाटील,कार्यालयीन सचिव भाऊसाहेब दिपक काशिनाथराव प्राचार्य संजय भोळे,प्राचार्य/ मुख्याध्यापक आर एस चौधरी,राजेंद्र पवार,गोपाळ नखलस,अमृत खलसे, राजेंद्र पवार,अमृत भवरे,राजू जैन, प्रा.प्रशांत देशमुख,उपप्राचार्य श्याम साळुंखे, या सर्व संस्था परिवारांनी सदर प्रसंगी अभिनंदन करून सत्कार केला.व पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. …