आ. अब्दुल सत्तार यांच्या पाठपुराव्याला यश
जागेचा तिढा सुटला ; फर्दापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा ..
सोयगाव तालुका..
प्रतिनिधी संतोष गर्दे.
सोयगाव , दि 5 माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून फर्दापूर ता. सोयगाव येथे मंजूर प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यासाठी येथील शासकीय जमीन विनामूल्य उपलब्ध करून दिली असून फर्दापूर येथे आता हायटेक प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आ. अब्दुल सत्तार यांच्या पाठपुराव्याने फर्दापूर वाशियांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण होत आहे. फर्दापूर येथील गट क्रमांक 56 मधील 1.85 हेक्टर सरकारी जमीन मंजूर प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यासाठी महसूल व वन विभागाच्या वतीने सार्वजनिक आरोग्य विभागास विनामूल्य जागा प्रदान करण्याचा आदेश आज ( दि.5 ) रोजी या विभागाचे सचिव संजय धारूरकर यांनी प्रदान केला आहे. त्यामुळे आता फर्दापूर येथे सर्व सुविधायुक्त हायटेक प्रा.आ. केंद्र उभारण्यात येणार आहे.
फर्दापूर व परिसरातील नागरिकांची अनेक दिवसाची मागणी व आवश्यकता लक्षात घेवून आ. अब्दुल सत्तार यांनी फर्दापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी मिळवून दिली तसेच येथे प्रा. आ. केंद्र उभारण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळवून दिली होती. येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी इमारत नसल्याने आ. अब्दुल सत्तार यांनी यासाठी 6 कोटी 25 लाख रुपयांचा निधीला देखील मंजुरी मिळवून दिली होती. परंतु जागे अभावी येथे अद्याप प्राथमिक आरोग्य केंद्र उभे राहू शकले नव्हते. फर्दापुर हे जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला लागून असलेले गाव असल्यामुळे येथे देश – विदेशातील हजारो पर्यटक येत असतात. शिवाय राष्ट्रीय महामार्गावरील हे गाव असून मोठी लोकसंख्या असलेले गाव आहे . त्या अनुषंगाने सदरील बाब आ. अब्दुल सत्तार यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच या ठिकाणी हायटेक व सर्व सुविधायुक्त प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यासाठी शासनाने जमीन उपलब्ध करून द्यावी यासाठी आ. अब्दुल सत्तार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला . त्यांच्या पाठपुराव्याला अखेर आज यश आले आहे. आज महसूल व वन विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यासाठी मूल्यरहित व महसुलमुक्त किमतीने जमीन हस्तांतरित करण्याचा आदेश जारी करण्यात आला .यामुळे आता फर्दापुर वासियांचा प्राथमिक आरोग्य केंद्र चा प्रश्न सुटणार आहे.🔴 .. .चौकट..
फर्दापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यासाठी आज महसूल व वन विभागाकडून मूल्यरहित व महसुलमुक्त किमतीने जमीन हस्तांतरित करण्याचा चा आदेश जारी करण्यात आला .याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित ( दादा ) पवार यांचे आभार. आज जागेचा प्रश्न सुटल्याने फर्दापूर येथे सर्वसुविधा युक्त हायटेक प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येईल. यासाठी 6 कोटी 25 लाख रुपयांचा निधीला मान्यता मिळालेली आहे. यानंतर देखील पुढे लागणारा निधी लागेल त्याप्रमाणे उपलब्ध करून देवू , यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – आ. अब्दुल सत्तार
