प्रतिनिधी. संतोष गर्दे. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी निमित्त वाकोद येथे प्राथमिक शाळा मध्ये अगोदर रॅली काढून पूर्ण गावात रॅली फिरवून अगोदर ग्रामपंचायत येथे अर्चना दीपक गायकवाड सरपंचाच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नंतर रॅली प्राथमिक शाळेमध्ये येऊन ध्वजारोहण निकिता सुनील भिल शालेय शिक्षण समिती सदस्य व मुख्याध्यापक राजेंद्र शेळके सरयांच्या हस्ते करण्यात आला .व ध्वजारोहण झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात झाली विद्यार्थ्यांनी 40 गाण्यांवरती डान्स नाटक बसवलेले होते ते सर्व दोन ते तीन तास कार्यक्रम चालला नंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला व या कार्यक्रमास उपस्थित सरपंच अर्चना गायकवाड, उपसरपंच प्रकाश गाढवे.ग्रामस्थ शालेय शिक्षण समिती अध्यक्ष दीपक गायकवाड, शिक्षण प्रेमी विनोद राऊत, मुख्याध्यापक शेळके सर,व ग्रामस्थांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला
.. या कार्यक्रमासाठी शिक्षकांनी खूप मेहनत घेतली…
