सोयगाव,दि.१९( प्रतिनिधी )
पोलीस अधीक्षक कार्यालय,सायबर पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर(ग्रामीण)अंतर्गत पोलीस स्टेशन सोयगाव यांच्या वतीने रेझिग डे उपक्रमातर्गत सोयगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल, पोलीस उपनिरीक्षक गजानन आरेकर,पोलीस उपनिरीक्षक गणेश झलवार,पोलीस उपनिरीक्षक रज्जाक शेख,याच्या तर्फे सोयगाव शहरातील जिल्हा परिषद प्रशाला सोयगाव येथे दि.६ जानेवारी सोमवार रोजी विद्यार्थ्यासाठी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.या परीक्षेत जवळपास १५० विद्यार्थी,विद्यार्थीनीनी सहभाग नोंदविला होता.या विद्यार्थ्या मधुन प्रथम क्रमांक सार्थक राजू औरंगे,द्वितीय कुमारी रुख्मिणी अशोक कोकाटे तर तृतीय क्रमांक कशिष रविंद्र इंगळे याचा क्रमांक आला.या विद्यार्थ्याचा सिल्लोड पोलीस उपविभागीय कार्यालय येथे उपविभागिय अधिकारी दिनेशकुमार कोल्हे तसेच पोलीस निरीक्षक शेषराव उदार याच्या शुभहस्ते ट्रॉफी,प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.निवडी बद्दल विद्यार्थ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल,पोलीस उपनिरीक्षक गजानन आरेकर,पोलीस शिपाई राजू बरडे,सादिक तडवी,रविंद्र तायडे,अजय कोळी,गजानन दांडगे याच्यासह शाळेचे मुख्याध्यापक दादाराव राठोड, सुकदेव पाटील,अनिल ठाकुर,वैजनाथ साळवे,सुनिल शेठे,दौलतसिंग परदेशी, बागुल सर,पंकज रगडे,सह धनराज औरंगे, योगेश बोखारे,संदिप सोहनी,शाम देवरे, पांडुरंग औंरगे,राजू औंरगे अनेक मान्यवरानी अभिनंदन केले.
सोबत फोटो –