
श

ेतकरी हिताच्या मागण्यांसाठी बेटावद बुद्रुक शिवतर्थ येथे आमरण उपोषण
जळगाव | प्रतिनिधी (संतोष गर्दे)
शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवतर्थ, बेटावद बुद्रुक, ता. जामनेर येथे शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. शेतकरी वर्गाच्या वतीने तहसीलदार, जामनेर यांना निवेदन सादर करून मागण्या तात्काळ मान्य करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत –
१) गावात हमीभाव केंद्राची स्थापना करण्यात यावी.
२) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व नमो सन्मान योजना या दोन्ही योजनांचा लाभ पती व पत्नी दोघांनाही देण्यात यावा.
३) शेतकऱ्यांना दरमहा दहा हजार रुपये इतके ठराविक किमान मानधन देण्यात यावे.
४) शेतीशी संबंधित सर्व मजुरीची कामे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यात यावीत.
वरील सर्व मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास दिनांक १ जानेवारी २०२६ पासून शिवतर्थ, बेटावद बुद्रुक येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले असल्याची माहिती शेतकरी नेते श्री. सुभाष नारायण ठोंबरे यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
