अजिंठा वन परिक्षेत्रात अवैध वृक्षतोड सुरुच ;
पर्यावरण धोक्यात !सिल्लोड प्रतिनिधीमानवाने स्वतःच्या स्वार्थाकरिता निसर्गालाच दावणीला बांधले आहे. शासकीय स्तरावर झाडे लावा, झाडे जगवा या मोहिमेचा कितीही उद्घोष होत असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती गंभीर आहे. वृक्षतोड थांबता थांबत नाही. अजिंठा वन परिक्षेत्रात राजरोस वृक्षांची कत्तल ही बाब नित्याचीच झाली आहे.
वृक्ष हे पृथ्वी व पर्यावरणाचे चैतन्य आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे संतुलन दिवसेंदिवस ढासळत चालले असून, असमतोल वाढला असल्यामुळे शासकीय पातळीवर सतत वृक्ष लागवडी सारख्या अनेक योजना राबविल्या जात आहेत. वृक्षांचे संगोपन व संवर्धन यावर कोट्यवधींचा खर्च होतो. दुसरीकडे मात्र जंगलातील व शेतामधील बांधावरील हिरवे गार झाडांवर व्यापारच्या माध्यमातून कुर्हाड चालविली जात असल्यामुळे
मागील २० दिवसापासून ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष मंगेश सनान्से यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना व वनमंत्री यांना लेखी तक्रार व संपूर्ण पुरावे सादर केले तरी सुद्धा
अजिंठा वन परिक्षेत्रातील अजिंठा , शिवणा, उडणगाव, अंभई, माडणा, सराटी, हळदा, तसेच सवळदबारा , जामठी आदी क्षेत्रातील वन जंगलातील व शेतशिवारातील अनेक वर्षे जुनी असणारी ही झाडे शेतकर्यांना प्रलोभन दाखवून कापण्याचा सपाटा सध्या लाकूड व्यापारी करीत आहेत . वनविभागाशी साठगाठ असल्याने विना परवाना अवैध वृक्ष तोड करून रात्री ट्रकामध्ये लाकडे भरून पर जिल्ह्यासह राज्यात जात आहे .लालसेपोटी बहुमुल्य असलेली वृक्षसंपदा नष्ट केली जात आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देवून रात्रीच्या वेळेस गस्त करावी जेणे करून वृक्ष तोड व वाहतुकीला आळा बसेल .
– – -झाडे जगवा वृक्षतोड थांबवा :-
अवैध वृक्षतोड वन विभागासाठी नित्याची बाब ठरली आहे. एकिकडे दरवर्षी वृक्ष लागवडीवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जाते…
अवैध वृक्षतोड थांबवणे ही एक मोठी समस्या आहे, ज्यासाठी कायद्याची अंमलबजावणी, प्रशासकीय जागरूकता आणि नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे; शासनाने दंड वाढवला असला तरी भ्रष्ट अधिकारी आणि नियोजनाचा अभाव यामुळे ही समस्या कायम आहे, ज्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वन विभाग, पोलीस आणि महसूल विभागांनी एकत्र येऊन कठोर कारवाई करणे गरजेचे आहे .(मला वाचवा एक अनोखा उपक्रम राबविले वृक्ष तोड थांबणार का? ) .वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे आता लक्ष लागले आहे .
– – – – – –
मागील एक महिन्यापासून माझा लढा अवैध वृक्ष तोड व अवैध वाहतूक यांच्या विरोधात सुरू आहे .एक महिना होत आला .तरीसुद्धा अद्यापर्यंत वृक्ष तोड सुरूच आहे .वरिष्ठांनी तात्काळ लक्ष देऊन वृक्षतोड थांबवावी अशी मागणी ग्राहक संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष मंगेश सनान्से यांनी केले आहे .
Related Posts
वाकोद गावचे पोलीस पाटील श्री *.संतोष रामराव देठे,विश्वास रामराव देठे,संजय रामराव देठे* यांच्या *आई कै. जनाबाई रामराव देठे* रा. वाकोद तालुका जामनेर यांचा अकस्मात निधन झाले.अंत्यविधीची वेळ *उद्या(मंगळवार) सकाळी 10:00वाजता…
प्रतिनिधि संतोष गर्दे27/01/2026 रोजी मन्नानगड रत्नागिरी येथील सिकंदर कलाल (खाटीक) he हॉटेल नानाचा ढाबा येथे जेवणासाठी आले असता.ते त्यांची पिशवी विसरून गेले. त्यात 80000 रु होते. सिकंदर कलाल यांना काही…
