माजी विद्यार्थ्याच्या स्नेह संमेलनात घेतला व्यसनमुक्तीचा प्रण
• २५ वर्षा नंतर भरली शाळा ;
• सन २००० मधील विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा
प्रतिनिधी संतोष गर्दे
वाकोद ता.जामनेर
२५ वर्षा पूर्वी शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा शाळा भरली बाका वरच्या मित्र मैत्रिणी सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला निमित्त होते. स्व राणीदानजी जैन माध्य. विद्यालय वाकोद येथील सन २०००- २००१च्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह संमेलन तथा शिक्षक सन्मान सोहळा या प्रसंगी कार्यक्रमाची सुरूवात विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी आलेल्या सर्व शिक्षकांचा व प्रमुख पाहुण्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन सत्कार, सन्मान करण्यात आला
यावेळी अगोदर सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी आपला परिचय करून दिला माजी विद्यार्थी अर्पण लोढा, सचिन सरदार, अनिल जाधव, उज्वला गोसावी, ज्योती चौधरी, सिमा देशमुख, राजू जाधव, विकास इंगळे यांनी आपल्या मनोगतातुन शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच त्या वेळी असलेले गुरू जण यांनी सुद्धा आपल्या मनोगतातुन शिकवत असताना विद्यार्थी कसा घडतो घडवल्या जातो यावर प्रकाश टाकत त्यावेळच्या आठवणी व उपस्थित माजी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे मनोगत व्यक्त केले लोहारा शाळेचे उपमुख्याध्यापक एस. व्हि. शिंदे सरांनी आपल्या गायनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले.
व्यसनमुक्तीचा घेतला प्रण: व्यसनाधीनतेच्या प्रमाणात
दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून भावी पिढी संसाराची राख रांगोळी करीत आहे अनेकांचे आयुष्य बरबाद होत आहे आताच्या युवा पिढीला व्यसन हे लागलेली एक कीड असून उभ्या आयुष्याचे वाटोळे होताना दिसत आहे आई वडिलांच्या उपकाराची जाण ठेवून त्यांची सेवा करा आणि व्यसना पासून दूर रहा असा नारा या माजी विद्यार्थी आणि विद्यार्थीनी दिला आणि सर्वानुमते व्यसना पासून दूर राहण्याची गुरुजनाकडून शपथ घेतली असा माजी विद्यार्थ्याच्या स्नेह संमेलनात असा उपक्रम राबविणारी पहिलीच आदर्श घटना घडली आहे गुरुजनांचा साक्षीने सर्व उपस्थिती विद्यार्थी आणि विद्यार्थीनी शपथ घेऊन एक आदर्श निर्माण केला आहे याबद्दल गुरुजनांनी आणि प्रमुख पाहुणे यांनी या उपक्रमा बाबत या विद्यार्थ्यांचे कौतुक केले असून याचा संदेश सर्वत्र महत्वपूर्ण ठरणार आहे.
कार्यक्रमा प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे माजी मुख्याध्यापक पी. बी. पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून जैन फॉर्म चे व्यापस्थापक विनोदसिंह राजपूत, डी.एस. पाटील, ए. डी. बावस्कर डी. एम. गरूड, एस व्ही शिंदे, प्राचार्य एस. टी. चिंचोले, पी . एस. पाटील, एन. टी. पाटील, एस. बी.निकम, जे. एस. जुंबळे शिपाई प्रकाश पवार उपस्थीत होते. स्नेह संमेलन कार्यक्रमासाठी जामनेर येथील धनराळे क्लासेस चे संचालक योगेंद्र धनराळे आणि लोहारा शाळेचे उपमुख्याध्यापक एस. व्हि. शिंदे यांनी आपल्या सदाबहार गायनाने उत्साह वाढविला सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्पण लोढा, तर अनिल जाधव यांनी आभार मानले यावेळी विजय देठे, नाना पांढरे, अनिल पाटील, मिलींद जैन, शरद पाटील, किरण जाधव, भागवत जाधव, संजुगीर गोसावी, विकास शिरसाठ, प्रदीप देशमुख, विनोद फरकांडे, हरुन तडवी, विकास कुमावत, गणेश पांढरे, दीपक देहडे, विष्णू शिंदे, गजानन काकडे, सतीश सपकाळे, संतोष लोहार, कमलेश भगत, उध्दव लोहार, बापू फरकांडे, शेख आरीफ, भगवान राऊत, भारत रेकनोद, दुर्गा गोसावी, अरुणा होळे, विद्या पाटील, सीमा पाटील, स्वाती देशमुख, सुष्मा सपकाळे, योगिता हिवाळे, शारदा बेलपत्रे, शोभा चौथे, ज्योती थोरात, आशा कामळे, संगीता जोशी, संगीता कुमावत यांच्या सह अनेक माजी विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.
Related Posts
वाकोद गावचे पोलीस पाटील श्री *.संतोष रामराव देठे,विश्वास रामराव देठे,संजय रामराव देठे* यांच्या *आई कै. जनाबाई रामराव देठे* रा. वाकोद तालुका जामनेर यांचा अकस्मात निधन झाले.अंत्यविधीची वेळ *उद्या(मंगळवार) सकाळी 10:00वाजता…
प्रतिनिधि संतोष गर्दे27/01/2026 रोजी मन्नानगड रत्नागिरी येथील सिकंदर कलाल (खाटीक) he हॉटेल नानाचा ढाबा येथे जेवणासाठी आले असता.ते त्यांची पिशवी विसरून गेले. त्यात 80000 रु होते. सिकंदर कलाल यांना काही…
