*पळसखेडा येथील नवदुर्गा मित्र मंडळ च्या देवीचे विसर्जन*प्रतिनिधि संतोष गर्दे
पळसखेडा येथे नवदुर्गा मित्रमंडळाच्या दुर्गादेवीचे प्रतिमेचे आज विसर्जन करण्यात आले देवीच्या प्रतिमेचे पूजन करून विसर्जनाच्या साठी देवीची प्रतिमा या सर्व सजवण्यात आलेली होती.
नवदुर्गा मित्र मंडळाने यावेळी नवीन आदर्श समोर ठेवत अत्यंत पारंपारिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक काढलेली होती त्यासाठी प्रसंगी श्रद्धा साई भजनी मंडळ वाकोद यांच्या भजन आणि ढोलकीच्या वाद्यात दुर्गादेवी यांच्या प्रतिमेचे विसर्जन मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली तेव्हा गावामध्ये अत्यंत सांस्कृतिक वातावरण निर्माण झालेलं होतं सुसंस्कृतपणे विसर्जन मिरवणूक काढण्याचं एक अनोखा उदाहरण यावेळी मंडळाकडून देण्यात आलं यावेळी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य तसेच सर्व भाविक मोठ्या संख्येने हजर होते