ाकोद पुलाजवळ दोन मोटारसायकलींच्या धडकेत एक जण जखमी.

दुसरा मोटारसायकलस्वार घटनास्थळावरून फरार

प्रतिनिधी संतोष गर्दे
फर्दापुर छत्रपती संभाजीनगर- जळगाव महामार्गावरील मराठवाड्याच्या सीमेवरील फर्दापूर वाकोद येथील वाघूर नदीच्या पुलाजवळ दोन मोटारसायकलींमध्ये समोरासमोर धडक होऊन एक जण जखमी झाला. ही घटना शुक्रवार, १९ रोजी दुपारी १:५० वाजता घडली, तर दुसरी मोटारसायकली घेऊन घटनास्थळावरून पळून गेला. मिळालेल्या माहितीनुसार, जळगावहून फर्दापूरकडे जाणारी मोटारसायकली आणि फर्दापूरहून जामनेरकडे जाणारी मोटारसायकली क्रमांक एमएच १९ एव्ही, २४२७ ही वाकोदच्या पुलाजवळ एकमेकांवर आदळली. या अपघातात र प्रवीण संतोष पाटील (४५) रहिवासी सोनाळा ता. जामनेर हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती फर्दापूर पोलिस ठाण्याचे पु.कॉ भरत कोळी यांना मिळताच ते तातडीने फर्दापूर टी पॉइंटवर उभ्या असलेल्या जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थेच्या रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहोचले. रुग्णवाहिका चालक काशीनाथ कौतिक नरोटे यांनी जखमींना पहूरच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. फर्दापूर पोलिस पुढील तपास करत आहेत.