
ज

ामनेर तालुका
जिला जलगांव
सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत आज दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी नवीन शासकीय गोदाम परिसर, जामनेर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या प्रसंगी मा. साधनाताई गिरीश महाजन, माजी नगराध्यक्ष जामनेर नगरपरिषद यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नगरपरिषद, महसूल विभाग तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी व स्थानिक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
तहसीलदार जामनेर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला व सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना सक्रिय सहकार्य देण्याचे आवाहन करण्यात आले.
👉 या वृक्षारोपण उपक्रमामुळे जामनेर शहर व परिसर हिरवाईकडे वाटचाल करेल तसेच पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
