*गरुड विद्यालयात तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा आयोजन*धी.शेंदुर्णीसे.एज्यु.को-ऑप सोसा.लि.शेंदुर्णी येथे,
आ.ग.र गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी येथील महाविद्यालयाच्या कॉलेज स्टेडियमवर जामनेर तालुका स्तरीय शासकीय मैदानी क्रीडा स्पर्धा 2025 ट्रॅक इव्हेंट,फिल्ड इव्हेंट च्या अंतर्गत धावणे,गोळा फेक,थाडी फेक,उंच उडी घेण्यात येत आहेत.तरी.या स्पर्धा उद्घाटन सोहळा प्रसंगी शेंदुर्णी एज्यु. सोसा.चेअरमन दादासाहेब संजय रावजी गरुड हे अध्यक्षस्थानी होते तर त्यांच्यासमवेत संस्थेचे सचिव काकासाहेब सागर मलजी जैन, सहसचिव दादासो.यु. यु.पाटील, कार्यक्रमाचे उद्घाटक व मनोगत अशोक पाटील (वाळकी)प्रमुख पाहुणे म्हणून घनश्याम पाटील(पोलिस-पाटील वाकळी),शांताराम बापू गुजर,तालुका क्रीडा समन्वयक आसिफ खान सर, जिल्ह्यातून आलेल्या महिला पंच ममता शर्मा (एन आय.एस) राष्ट्रीय खेळाडू सुप्रिया पाटील जी सी पाटील, रवी जाधव,अनिल पाटील,
धनंजय नाना गरुड,पत्रकार युवराज सूर्यवंशी,दीपक पाटील
,डी आर चौधरी,योगेश पाटील, विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर एस चौधरी,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भोळे, पर्यवेक्षक व्ही.एम.शिरपुरे,विनोद पाटील,
इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या मैदानी स्पर्धेत जामनेर तालुक्यातून 34 शाळेंमधील 14,17,19 वयोगटातील मुलं मुली मिळून 680 खेळाडूंनी सहभाग नोंदवला
100,200,400,600,800,
1500,3000 मीटर धावणे इ. तर गोळा फेक थाळीफेक भालाफेक उंच उडी लांब उडी इत्यादी खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धा नियोजनात महाविद्यालयातून व विद्यालयातून डॉ.महेश पाटील, पीपी पाटील,आर एम सपकाळे, अमोल पाटील,महाविद्यालयाचे मुकेश पाटील,पी एम पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे संजय जावळे इत्यादी क्रीडा शिक्षकांसह विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षिका यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर.एस. चौधरी सरांनी केले तर, सूत्रसंचलन रणजित सोनवणे यांनी केले.आभार पी.पी.पाटील यांनी मानले.