ळसखेडा गावाला समस्यांचा वेढा कधी सुटेल त्याच्या प्रतीक्षेत ग्रामस्थ.प्रतिनिधि संतोष गर्दे संभाजी नगर जिला
सोयगाव :- तालुक्यातील पळसखेडा या गावातील रस्ते गायब गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याने रस्त्यालाच नाल्यांचे स्वरूप आल्याचे दिसून येत आहे तर दुसरी कडे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत चाललाय मात्र याकडे ग्रामपंचायत मात्र जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचं दिसत आहे.
गावातील महादेव मंदिर जिल्हा परिषद शाळा जवळ जाणारा रस्ता एक वर्षापासून खराब झालेला आहे आता या ठिकाणी संपूर्ण गावाचं सांडपाणी येऊन साचते त्यातून वाट काढत ग्रामस्थांना व शाळेमध्ये जाणारा विद्यार्थ्यांना वापर करावा लागत आहे तसेच गावामध्ये त्याचबरोबर गावातील मुख्य प्रस्तादेखील चाळणी झालेला आहे त्या ठिकाणी देखील घाणीच साम्राज्य व सांडपाणी साचत आहे ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचं ग्रामस्थांचा मत आहे.
त्याचबरोबर गावामध्ये अतिक्रमणाच्या प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे ग्रामपंचायत कडून कुठलीही परवानगी न घेता गावामध्ये घरांचे बांधकाम होत आहे ते बांधकाम उताऱ्यावर असणाऱ्या जागेपेक्षा जास्त होतो त्यामुळे गावात दिवसेंदिव अतिक्रमण वाढत आहे याविषयी ग्रामपंचायत करायला वारंवार सांगून देखील यावर मात्र ग्रामपंचायत कुठलीही दखल घेत नाही व त्याचा त्रास सर्वसामान्य जनतेला होत आहे त्या सर्व विषयावर ग्रामपंचायतीने मार्ग काढावा अशी मागणी गावातील सर्व स्तरावरून होत आहे