तिर्थ रेसिडेन्सी चौधरी नगर येथे संत सेना महाराज जयंती उत्साहात साजरी
——————————
सोयगाव (प्रतिनिधी) –
संतोष गर्दे..
——————————
जालना येथील तिर्थ रेसिडेन्सी चौधरी नगर येथे दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८:३० वाजता संत सेना महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात संत सेना महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. पुष्पहार अर्पण करण्याचा मान श्री. रंगनाथ जारे व जगदीश भुंबर यांना मिळाला.
यावेळी कार्यक्रमास प्रकाश वाघमोडे सर,दिनकर बापू भुतेकर, संतोष भांडवले, दीपक खांडेभराड, दीपक आरमाळ, किशोर शिंदे, विलास घुले, विष्णू भुतेकर, राम जारे, भारत गर्दे, मकरंद बोकन, बालाजी डुकरे, बिराजदार सर, राजेश पवार, श्याम भुतेकर, सुभाष घुले तसेच तीर्थ रेसिडेन्सीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या जयंतीनिमित्त संत सेना महाराजांच्या कार्य व विचारांचा जागर करण्यात आला. उपस्थितांनी संतांच्या शिकवणीप्रमाणे समाजात बंधुभाव, प्रेम व सेवा भावनेचा संदेश पसरवण्याचा संकल्प केला.
