ोयगाव : शेंदुर्णी (ता.जामनेर) येथील त्या घटनेच्या निषेधार्थ सोयगाव येथे रास्ता रोको व निषेध मोर्चा ; तहसीलदार यांना निवेदनप्रतिनिधी संतोष गर्दे
सोयगाव
शेंदुर्णी (ता.जामनेर जी.जळगाव) येथे स्वातंत्र दिनी (दी.१५) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची अज्ञात व्यक्तीने जातीय द्वेषातून विटंबनेची घटना घडली होती.या घटनेच्या निषेधार्थ सोयगाव येथील बौद्ध समाजासह डॉ.आंबेडकर वादी पक्ष संघटनेतर्फे सोयगाव येथे बुधवारी (दी.२०) तीव्र निषेध करण्यात आला. रास्ता रोको आंदोलन करण्यात येऊन तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून (सोयगाव) या निषेध मोर्चास सुरुवात करण्यात आली.या मोर्चात रिपब्लिकन सेना,भारतीय बौद्ध महासभा,वंचित आघाडी,बहुजन समाज पार्टी,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), व भीम संदेश धम्म प्रचारक संघ गलवाडा यांच्यासह छोट्या मोठ्या पक्ष संघटनांनी सहभाग घेतला होता.हातात निळे ध्वज घेऊन डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या विजयाच्या घोषणा देत, या घटनेतील आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी करीत मोर्चा छ्त्रपती शिवाजी महाराज चौक येथे आल्यावर एक तासभर रास्ता रोको करण्यात आला.त्यांनतर हा मोर्चा सोयगाव एस टी बसस्थानक – रामजीनगर मार्गे तहसील कार्यालयावर धडकला.
सोयगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार संभाजी देशमुख यांना सकल बौद्ध समाज,भारतीय बौद्ध महासभा,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले),आदी पक्ष संघटनेतर्फे निवेदन देत त्या घटनेचा निषेध करण्यात आला.तसेच या घटनेतील माथेफिरू आरोपीस कठोर शिक्षा करण्यात येऊन त्या मागचा मास्टर माईंड शोधून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा,व शेंदुर्णी येथे नव्याने डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविणयाचें निवेदन देण्यात आले.