पळसखेडा ग्रामपंचायत येथे बैलपोळा व गणेशोत्सवानिमित्त शांतता बैठक.

प्रतिनिधी संतोष गर्दे सोयगाव
फरदापुर :- पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या पळसखेडा गावामध्ये फरदापुर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील साहेब यांनी शांतता बैठक घेतली.
आगामी बैलपोळा व गणेश उत्सव वा निमित्त ही शांतता बैठक घेण्यात आलेली होती.
या बैठकीला पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील साहेब यांनी संबंधित केले त्यामध्ये प्रामुख्याने बैलपोळा सण अत्यंत शांततेत साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले तसेच गणेश उत्सव मंडळांना देखील शांततेमध्ये उत्सव करण्याचा तसेच उत्सवाच्या मिरवणुकी दरम्यान डीजे न वापरता ढोलताशे वाजवण्याचा सांगण्यात आले तसेच ग्रामस्थांनी व गणेश मंडळांनी आमच्याकडून कुठल्याही प्रकारचे वाद होणार नाही पोळा व गणेश उत्सव त्यांच्या शांततेत पार पडला जाईल त्याचे आश्वासन दिले यावेळी फर्दापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील साहेब तसेच पोलीस कर्मचारी पळसखेडा गावचे पोलीस पाटील गणेश घोंगडे, सामाजिक कार्यकर्ते राहुल सोनी, सोसायटीचे माजी चे अरमन विजय शर्मा, विजू पांढरे,कल्पेश पांढरे, मनोज तडवी, शरद गुरव, मंगल राजपूत,धीरज राजपूत राहुल रेकनोद, तसेच गावातील नागरिक व गणेशो उत्सव मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य हजर होते