
सोयगाव येथील कै.श्री.बाबुरावजी काळे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित,सोयगाव यांची २७ वी वार्षिक सर्व साधारण सभा उत्साहात संपन्न
सोयगाव,दि.६( प्रतिनिधी)
येथील कै.श्री.बाबुरावजी काळे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित,सोयगाव यांची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि.६ बुधवार रोजी सकाळी ९:०० वाजता व्यंकटेश कॉम्प्लेक्स (छत्रपती शिवाजी महाराज चौक जवळ) संस्थेच्या वरच्या मजल्यावर सोयगाव येथे संस्थेचे चेअरमन दिलीप राजमल बिर्ला यांच्या अध्यक्षतेखालील ठेवण्यात आली होती.
यावेळी संस्थेचे चेअरमन दिलीप बिर्ला यांच्या हस्ते कै.बाबुरावजी काळे व सरस्वती लक्ष्मी माता यांच्या प्रतिमेस पूजन करून सभेला सुरुवात करण्यात आली.यावेळी जेष्ठ सभासद तुकाराम कळवत्रे,रमेश जावळे,यांनी पतसंस्थेविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.पतसंस्थेचे चेअरमन दिलीप बिर्ला यांनी आलेल्या सर्व सभासद,प्रमुख पाहुणे,विविध पतसंस्थेचे सभासद,कर्मचारी, यांचा गुलाब फूल देऊन स्वागत करण्यात आले.तसेच यावेळी पतसंस्थेचे चेअरमन दिलीप बिर्ला यांनी पतसंस्थेविषयी कर्ज वाटप,वसुली,वेळेवर कर्ज भरणा करून संस्थेला वेळेवर सहकार्य करावे अशा अनेक विषयी सभासद यांना मार्गदर्शन केले.व
यावेळी पतसंस्थेचे चेअरमन दिलीप बिर्ला,व्हाईस चेअरमन योगेश बोखारे,संचालक दत्तात्रय देसाई,भगवान पाटील,सुलेमान उस्मान शेख,कृष्णा कुर्लेकर,बाबुराव चव्हाण,राजेश एलीस,सह बन्सीलाल बेडवाल,भैरवनाथ पतसंस्थेचे मॅनेजर धनराज औरंगे,गोकुळ रोकडे,स्वामी समर्थ पतसंस्थेचे सुनील शेंगदाणे,देविदास बैरागी,तिरुपती अर्बनचे मॅनेजर विकास देसाई,विशाल घन,विष्णू गव्हाणे,सतीश मंडवे,राजू औरंगे,सह सभासद उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ सभासद रमेश जावळे यांनी केले तर आभार प्रदर्शन चेअरमन दिलीप बिर्ला यांनी केले.व पतसंस्थेचे मॅनेजर सिताराम गोतमारे कॅशियर कृष्णा शेवाळकर यांनी परिश्रम घेतले.
सोबत फोटो –
