प्रतिनिधी संतोष महाले

प्रभात नागरी वस्ती :
मोसमी पाऊस आणि सतत कोसळणाऱ्या पावसामुळे आनंद नगर , जय हिंद नगर व इतर प्रभात नागरी वस्तीतील नागरिकांचे हाल अक्षरशः बेहाल झाले आहेत. वस्तीमध्ये कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार सारडा कंट्रक्शन पी दास कंट्रक्शन यांच्या बेजबदर कामा मुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांना दुखापती देखील झाले आहे  त्यांनी खोदलेल्या रस्त्या मुळे अपूर्ण काम मुळे आनंद नगर, जय हिंद नगर इतर रस्त्या खोदून काढल्या मुळे काही प्रभाग या मध्ये अद्याप पक्के रस्ते नसल्यामुळे पावसाचे पाणी साचून चिखलाचा प्रचंड त्रास होत आहे. या चिखलातून चालणे म्हणजे नागरिकांसाठी संकटाचे कारण ठरत आहे. महिला, शाळकरी मुले, वृद्ध नागरिक आणि दैनंदिन कामासाठी जाणारे कामगार यांना दररोज जीव धोक्यात घालून या चिखलातून मार्गक्रमण करावे लागत आहे.

दररोज कामावर जाणाऱ्या कामगारांचे मोटर सायकल, गाडी पाय घसरून पडणे दुखापती झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही नवीन वस्त्यांमध्ये विंचू साप, सर्प निघणे सर्प दोष याची भीती नागरिकांना लागल्याने, गरोदर माता , आजारी रुग्णांना नेण्यासाठी रुग्णवाहिकांना देखील या वस्तीमध्ये पोहोचणे कठीण झाले आहे. अनेकदा पावसाच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना मदत करावी लागली. विशेष म्हणजे या रस्त्यांच्या समस्येबाबत नागरिकांनी अनेक वेळा न . प कार्यालय तसेच नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक विवेक धांडे , आरोग्य विभाग प्रमुख , ऑफलाइन टेंडर द्वारे मुरूम टाकण्यासाठी दिलेल्या ठेकेदार यांच्या कडे ,स्थानिक पातळीवर तक्रारी नोंदवल्या आहेत; मात्र अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही.

गावातील सर्व नगरातील कॉलनीनतील रस्ते हे विकास कामाच्या नाव खाली संथ गतीने गेल्या सहा महिन्यांपासून कामे चालू बंद आहे खोदून काढलेल्या “रस्ते आद्याप पर्यंत बांधले गेले नाहीत, तर पावसाळा म्हणजे शेंदुर्णी वासियान साठी आपत्ती आहे.चिखलात अबालवृद्ध पाण्याचा अंदाज येत नसल्याने पाय घसरून पडण्याच्या घटना वारंवार घडतात. मुलांना शाळेत पाठवणे देखील धोकादायक झाले आहे,” असे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले.

आरोग्य व स्वच्छतेवर परिणाम
रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे. मलेरिया व डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. चिखल व दुर्गंधीमुळे श्वसनाचे विकार व अॅलर्जीसारख्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.

नागरिकांनी तात्पुरते मुरूम टाकून रस्ते वापरण्यासाठी तयार करावे अशी मागणी
वस्तीतील नागरिकांनी केली आहे तसेच लवकरात लवकर पक्के रस्ते तयार करण्याची मागणी देखील जोर धरू लागली आहे. “दर वर्षी तक्रारी केल्यानंतरही प्रशासन आंगावर पांघरूण घेवून केवळ आश्वासन देते; परंतु प्रत्यक्षात काम होत नाही. यावर्षी रस्त्याचे काम केले नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.