शिधापत्रिकाधारकांनी मार्च अखेरपर्यंत ई. के.वाय.सी करणे बंधनकारक ..
पुरवठा अधिकारी काकासाहेब साळवे यांचे आव्हान

सोयगाव तालुका..
प्रतिनिधी संतोष गर्दे..
सोयगाव तालुक्यातील सर्व शिधापत्रिका धारकांनी मार्च अखेरपर्यंत ईकेवायसी करणे बंधनकारक ई केवायसी न केल्यास राशन कार्ड शिधापत्रिका यामधून नावे कमी होऊ शकते याची काळजी सर्व ग्राहकांनी घ्यायची आहे
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जाहीर आवाहन करण्यात येते की, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत अंत्योदय अन्न सुरक्षा योजना व प्राधान्य कुटुंब योजना अंतर्गत शिधापत्रिका धारकांना शासकीय अनुदानित अन्न धान्याचा लाभ सुरु ठेवण्यासाठी कुटुंबातील रेशनकार्ड मध्ये नोंदणी केलेल्या सर्व सदस्यांचे ई-केवायसी पुर्ण करणे बंधनकारक आहे. ज्या सदस्यांचे ई-केवायसी मुदतीत पुर्ण होणार नाही त्यांचा अन्नधान्य बंद होणार आहे. तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपल्या गावातील रास्तभाव दुकानदारांधी संपर्क करुन तात्काळ आपले ई-केवयसी पुर्ण करुन घ्यावे. ई-केवायसी करण्यासाठी संबंधित लाभार्थी यांनी रास्तभाव समदा उपस्थित राहुन ई-पॉस मशीनवर Biometric Authentication करुन पुर्ण करावे.
ई-केवासी पुर्ण न केल्यास अन्नधान्याचा लाभ बंद झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबधित लाभाथ्र्याची असेल नोंद सर्व सोयगाव तालुक्यातील शिधापत्रिका धारकांनी घ्यावी लागेल असे आवाहन सोयगाव तहसील कार्यालयाचे तालुका पुरवठा अधिकारी नानासाहेब साळवे यांनी सर्व नागरिकांना केली आहे
