तिर्थक्षेत्रजाळीचादेव घाटात अनोळखी इसामाचा मृत्युदेह परिसरात एकच खळबळ..
सोयगाव तालुका..
प्रतिनिधी संतोष गर्दे..दिनांक 10 मार्च 2025 वार सोमवार रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र जाळीचादेव येथे गाव परिसरामध्ये बुद्धनेश्वर फाट्याजवळ अजिंठा डोंगरात वरच्या भागाला गाई म्हशी व गुरे चारणाऱ्या काही ग्रामस्थांना एका पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला होता सदर माहिती या नागरिकांनी तिर्थक्षेत्र जाळीचादेव गावचे उपसरपंच सुधाकर उदरभरे यांना माहिती दिली, यावेळी त्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत सदर घटनेची माहिती पारध पोलिसांना दिली यावेळी पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने व बिटजमादार प्रदीप सरडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता सदर हद्द ही पारध पोलीस ठाण्याची नसल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर सदर माहिती धाड पोलिसांना दिली यावेळी धाड पोलिस ठाण्याची पोलीस निरीक्षक हे सुद्धा आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले मात्र ही हद्द सुद्धा धाड पोलीस ठाण्याची नसल्यामुळे सदर घटना ही फर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याची माहिती दबक्या आवाजात पोलीस विभागात सुरू होती यावेळी नागरिकांनी फर्दापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल साबळे यांना माहिती दिली फर्दापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे हे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी सदर मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता फर्दापूर सोयगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आहेत, मात्र हा अनोळखी इसम कोण आहे, याची मात्र अद्याप ओळख पटलेली नसून ही घटना घातपात आहेत का याचा शोध पोलीस करित आहे, यावेळी फर्दापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल साबळे . पोलिस उपनिरीक्षक चाटे .वन विभागाचे अधिकारी,पोलीसअमलदार कोळी .योगेश कोळी .प्रकाश कोळी .विनोद कोळी . रवींद्र सरवदे . यश काकडे .पोलीस पाटिल विलास अप्पा कुल्ली यासह पत्रकार बंधू पोलीस कर्मचारी व परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होत
Related Posts
पळसखेडा येथे पंचायत समिती सभापती उत्तम चव्हाण यांचा सत्कार🔹 ग्रामस्थ व ग्रामपंचायतीकडून उत्साहात स्वागत सोहळा🔹 घरकुल व गाय-गोठा योजनांच्या थकित रकमेबाबत दिली माहिती🔹 टप्प्याटप्प्याने सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणारबातमी…
