कडोबा महाराज माळी लिखीत संत माधव बाबा यांच्या चरित्र ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
शेंदुर्णी ता.जामनेर प्रतिनिधी
शेंदुर्णी येथील अध्यात्मिक संत पुरुष श्री माधव बाबा यांच्या वर ह.भ.प.कडोबा महाराज माळी यांनी लिहिलेल्या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते शनिवार दि.८ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड.प्रविण झंवर हे होते..या निमित्ताने ३ दिवस भजन, कीर्तन, प्रवचन व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दि.५ मार्च ते ७ मार्च रोजी दु.३ ते ५ या वेळात हभप.भागवत महाराज यांचे जाहीर प्रवचन आयोजित करण्यात आले होते.
ह.भ.प.गजानन महाराज धानोरा,हभप.संतोष महाराज शेंदुर्णी व हभप.गोविंद महाराज केकतनिंभोरा यांचे दररोज रात्री ८ वाजता कीर्तन आयोजित करण्यात आले होते.
श्री संत माधव बाबा समाधी सात उंबर या ठिकाणी होणाऱ्या या सोहळ्यात चरित्र ग्रंथाचे प्रकाशन सोहळ्यात हभप.अरविंद कुलकर्णी, चंद्रकांत बाविस्कर व मान्यवरांच्या यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविकात संस्थानचे अध्यक्ष अमृत खलसे यांनी या सोहळ्याचा उद्देश विषद करुन माधव बाबांच्या कार्याची माहिती देत संस्थानच्या वतीने मान्यवरांचे स्वागत केले.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन संतश्रेष्ठ कडोजी महाराज संस्थानचे गादीवारस हभप शांताराम महाराज भगत,जामनेर तालुका शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील संजय गरुड, गोविंद अग्रवाल सागरमल जैन, उत्तमराव थोरात, अरविंद कुलकर्णी व कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.प्रविण झंवर यांनी आपल्या मनोगतात श्री.संत माधव बाबा यांचे चरित्र जनतेच्या समोर पुस्तकाच्या माध्यमातुन आणलं व शेंदुर्णी चा इतिहास सुद्धा यात मांडण्यात आला आहे याबद्दल लेखक हभप.कडोबा महाराज माळी यांना धन्यवाद दिले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी लेखक हभप.कडोबा महाराज माळी यांनी श्री माधव बाबा यांच्या आयुष्यातील असंख्य आठवणी व त्यांच्या अध्यात्मिक धार्मिक कार्याची माहिती दिली.या पुस्तकासाठी सहकार्य करणाऱ्या सगळ्यांना धन्यवाद दिले.
यावेळी शांतीलाल जैन,,प्रकाश झंवर सौ.सरोजिनी गरुड,सौ.विजया खलसे,सौ.चंदाबाई अग्रवाल, नारायण गुजर, तुकाराम पाटील, श्रीकांत काबरा, डॉ.निळकंठ पाटील, बाबुराव घोंगडे, नामदेव बारी डॉ.मोहित जोहरे,बी.एम.चौधरी,अमृत गुजर,राजु भाऊ झंवर, सुधाकर बारी, डॉ.महेंद्र गिते,लक्ष्मण मोहने राजेंद्र भारुडे, अर्जुन बारी, मधुसूदन कुमावत, डॉ.पंकज सुर्यवंशी प्रकाश अग्रवाल,कडोबा गुजर गणेश अग्रवाल, सुनील शिनकर, गणेश पाटील,,हभप.कन्हैय्या महाराज परदेशी, , प्रविण गरुड, राजेंद्र पाठक तसेच शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, नगरसेवक नगरसेविका विविध संस्थांचे पदाधिकारी मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुत्रसंचलन अमृत खलसे यांनी केले तर आभार रोहित माळी यांनी मानले.महाआरती नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी संत माधव बाबा भक्त मंडळ शेंदुर्णी यांनी परिश्रम घेतले.