फर्दापूर ( प्रतिनिधी ) संतोष गर्देदि.3, आमदार
विधानसभेत सलग चौथ्यांदा निवड झाल्याबद्दल फर्दापूर गावकऱ्यांच्या वतीने आ. अब्दुल सत्तार यांचा लाडू तुला करून भव्य सत्कार करण्यात आला.
फर्दापूर येथील चौक परिसरात हा सत्कार सोहळा पार पडला. विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रम निमित्त आ. अब्दुल सत्तार फर्दापूर येथे आले होते. याप्रसंगी आ. अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांशी संवाद साधला. तसेच केलेल्या सत्काराला उत्तर देतांना आ. अब्दुल सत्तार यांनी गावकऱ्यांचे आभार मानले.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रभाकर काळे, कृउबा समितीचे सभापती केशवराव पा. तायडे, उपसभापती दारासिंग चव्हाण, संचालक नंदकिशोर सहारे, सिल्लोडचे माजी उपनगराध्यक्ष विनोद मंडलेचा , शिवसेना तालुकाप्रमुख धरमसिंग चव्हाण, शहरप्रमुख संतोष बोडखे, गटनेता अक्षय काळे, युवासेनेचे कुणाल राजपूत यांच्यासह माजी सभापती उस्मान पठाण, फिरोज पठाण, भीमा बोराडे, विलास वराडे, शेख जाकेर, रविंद्र बावस्कर, बंडू काळे, इस्माईल पठाण, दिपक आगळे,अनिल बोंढरे, उस्मान पठाण, शे. मुख़्तार, विजय तायडे,गुलाब बर्डे, हिरा चव्हाण, मकसूद कादरी,शे.मुस्तफ़ा, हामिद खा पठान आदिंसह गावकरी उपस्थित होते.
