शेंदुर्णी तालुका जामनेर प्रतिनिधी

शहरातील गरुड महाविद्यालयामध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी आणी उत्सुकता निर्माण व्हावी यानिमित्ताने दिनांक ०१/०१/२०२५ ते १५/०१/२०२५ पर्यंत ग्रंथालय पंधरवाडा कार्यक्रम निमीत्त ग्रंथालय विभागातर्फे वेगवेगळे उपक्रम आयोजित करून उत्साहात साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र शासनाचे उच्च व तंत्र शिक्षण विभाग, जळगाव उच्च शिक्षण सहसंचालय विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि धी, शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को- ऑपरेटिव सोसायटी लि.
अप्पासाहेब रा. भा. गरूड कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णी ग्रंथालय विभागातर्फे
दिनांक 16 /01/2025 गुरुवार रोजी सकाळी 10.30 वाजता ग्रंथ परिक्षण आणि निबंध कथन कार्यक्रम आयोजित करण्यात येऊन लेखक आणि वाचक यांनी पुस्तक वाचन कथन आणि परीक्षण करून उत्कृष्ट निबंधाची निवड करण्यात आली त्यामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय तसेच तिन प्रोत्साहन पर निबंधाची निवड करण्यात आली. यावेळी कार्यक्रम अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य डॉ. श्याम साळुंखे उपस्थित होते. तसेच सर्व समितीतील सदस्य , सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी जास्तीत जास्त संखेने उपस्थित होते .
वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम अन्तर्गत ग्रंथालय पंधरवडा अभिनव कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यात आला. याकरिता महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेवुन कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा . धम्मा धारगावे (ग्रंथपाल), मोहन पाटील, आणि सरलाताई गरूड यांनी मेहनत घेतली.