बिग बॉस मराठीची सध्या चांगलीच चर्चा आहे. खेळ सुरु होऊन आता आठ आठवडे उलटले आहेत. या आठ आठवड्यांमध्ये वेगवेगळी प्रकरणं, राडे चांगलेच गाजले. अशातच काल बिग बॉसच्या घरात एक धक्कादायक निर्णय बघायला मिळाला.

आर्या जाधवला बिग बॉसने घराबाहेर काढलं. निक्की तांबोळीवर हात उगारल्याने आर्या जाधवला बिग बॉसने घराबाहेर जाण्याची मोठी शिक्षा सुनावली. अशातच घराबाहेर पडल्यानंतर आर्याने केलेली पहिली पोस्ट चर्चेत आहे.

आर्या जाधवची बाहेर आल्यावर पहिली पोस्ट

आर्या जाधवला बिग बॉसने काल घराबाहेर जाण्याची मोठी शिक्षा सुनावली. आर्याने तिची चूक कबूल केली. इतकंच नव्हे तिने निक्कीची माफीही मागितली. परंतु बिग बॉसच्या मूलभुत नियमाचं उल्लंंघन झाल्याने आर्याला बिग बॉस मराठीमधून बाहेर काढण्यात आलं. यानंतर आर्याने सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आहे. आर्याने काळा रंग आणि तुटलेलं Heart अशी पोस्ट करुन तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आर्याला या शिक्षेमुळे किती दुःख झालंय, याची कल्पना करता येईल.