सोयगाव दि.17 –प्रतिनिधी संतोष गर्दे

सोयगाव तालुक्यातील बनोटी येथे कन्नड-सोयगाव च्या आमदार संजना जाधव यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आढाव बैठक आयोजित करण्यात आली होती. या आढावा बैठकीला सोयगाव च्या तहसीलदार व कर्मचारी उपस्थित होते. आढावा बैठक संपल्यानंतर तहसीलदार मनीषा मेने,नायब तहसिलदार संभाजी देशमुख, दोन तलाठी व कोतवाल संजय नावकर हे तहसिल कार्यालयाच्या एम एच 20 जि के 9078 या शासकीय वाहनांतून सोयगाव कडे येण्यास निघाले असता आढावा बैठकीच्या समोरील मैदानात असलेल्या खड्ड्यात तहसिलच्या शासकीय वाहनाचा चालक असलेल्या सचिन ओव्हळ याच्या निष्काळजी पणामुळे वाहनाचे चाक खड्ड्यात गेल्याने वाहन पलटी होतांना थोडक्यात बचवल्याची घटना बनोटी येथे सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली.आढावा बैठक करिता उपस्थित असलेल्या पैकी पाच सहा ग्रामस्थांनी पलटी होत असलेल्या वाहनाला मोठ्या हिमतीने आधार देऊन बाहेर काढल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. ग्रामस्थांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे तहसिल कार्यालयाचे शासकीय वाहन पलटी होता होता थोडक्यात बचावले आहे त्यामुळे मोठा अनर्थ टळला होता. दरम्यान तहसील कार्यालयाच्या शासकीय वाहनांवर चालक नसल्याने तहसीलदार मनीषा मेने या निवडणूक विभागातील संगणक चालक असलेल्या सचिन ओव्हळ यांच्याकडून अतिरिक्त चालक म्हणून काम करून घेत असल्याने संगणक चालक सचिन ओव्हळ या कर्मचाऱ्यांवर ताण पडत असल्याची चर्चा आढावा बैठक ठिकाणी सुरू होती.दरम्यान शासकीय वाहनांवर अधिकृत चालक नसल्याने वाहनांच्या सुरक्षेसह तहसिलच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.यावर जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.