प्रतिनिधी संतोष महाले
म कार्यकारी अभियंता
सार्वजनिक बांधकाम
विभाग- जामनेर जि- जळगाव

विषय:- शेंदुर्णी- सोयगाव रस्त्याचे नूतनीकरण / दुरुस्ती करणे बाबत ..

अर्जदार :- खालील सह्या करणारे शेंदुर्णी व परिसरातील सामान्य नागरिक.

महोदय
वरील विषयी विनंती पूर्वक सादर की, शेंदुर्णी- सोयगाव (रस्ता क्रमांक – ) हा अतिशय खराब झालेला आहे, आपणास यापूर्वी अनेक वेळा तोंडी व श्री चनावार साहेबांना याबाबत माहिती दिली आहे ,या रस्त्यावर रोज अनेक छोटे-मोठे अपघात होऊन नागरिकांचे शारीरिक -आर्थिक नुकसान होत आहे एवढेच नाही तर या रस्त्यावर गेल्या चार महिन्यात खराब रस्त्यामुळे व खड्ड्यामुळे दोन ते तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे त्यामुळे त्यांच्या परिवारावर फार मोठे दुःख कोसळले आहे, यास आपले कार्यालय जबाबदार आहे अशी नागरिकांची धारणा झालेली आहे.
मा. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांचे कडील आदेश दिनांक 16- 10- 2019 व मा.औरंगाबाद खंडपीठ जनहित याचिकेतील आदेश दिनांक 28- 2- 2020 च्या आदेशाने आपणाकडे सदर विषयी अर्ज सादर करीत आहे.
म्हणून आपण नियमाप्रमाणे सदर मा.उच्च न्यायालयांच्या आदेशाची अवमाननांना न करता आपण येत्या दहा दिवसात वरील विषयी निर्णय घेऊन योग्य ती कारवाई करावी. अन्यथा आपल्यावर फौजदारी स्वरूपाची कार्यवाहीसह *दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी* शेंदुर्णी येथे रास्ता रोकोचे सामान्य नागरिकांनी आयोजन केलेले आहे याची आपण नोंद घ्यावी, ही विनंती

माहितीसाठी
मा मुख्याधिकारी, न प शेंदुर्णी.
मा पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, पहूर
मा सर्व पत्रकार