प्रतिनिधी संतोष गर्देवाकोद ..जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकोद येथे राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री दीपक गायकवाड व गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री दिनकर वानखेडे व गोपाळ शहाणे यांचे हस्ते करण्यात आले याप्रसंगी शिक्षक विजय गायकवाड सर यांनी राजमाता व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकत मुलांना माहिती सांगितली…अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली.. तेव्हा रविवार असून देखील. उपस्थित शिक्षिका, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते..
