ोयगाव दि. १० (प्रतिनिधी) संतोष गर्दे हिंदू परिवर महिला शाखा व दुर्गा वाहनिनी यांनी सोयगाव तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन देत महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ तात्काळ लागू करण्याची मागणी केली आहे. तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी मनीषा मेणे – जोगदंड या गैरहजर असल्याने महिलांनी निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार राहुल पत्रिके यांच्याकडे निवेदन स्फूर्त केले. देशभरात वाढत्या फसवणूक, धर्मांतर, अपहरण व विवाहपूर्व छलकपटाच्या घटनांमुळे महिलांची सुरक्षा धोक्यात आल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणासह ११ राज्यांत हा कायदा लागू असून महाराष्ट्रानेही तो तातडीने अमलात आणावा, अशी भूमिका महिलांनी मांडली. NCRB च्या माहितीनुसार महिलांविरुद्धचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले असून, तरुणींना सोशल मीडिया व विविध संघटनांच्या माध्यमातून जाळ्यात ओढले जात असल्याचा आरोप करण्यात आला. सोयगाव येथे शेकडो महिलांनी एकत्र येऊन लव्ह जिहाद विरोधी कायदा पारित करावा, फसवणुकीने नातेसंबंध व धर्मांतर करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पथके नेमावीत, शाळा. – महाविद्यालयांत जनजागृती करावी, अशा मागण्याचे तहसीलदार सोयगाव यांना निवेदन देत सदरील प्रश्न तात्काळ अधिवेशनात घेण्यात यावा असेही निवेदनात म्हटले आहे. दर निवेदनावर नंदाताई आगे, निशु वाडेकर, स्वाती सोनार, मंगलाताई आगे, मयुरी ताडे, यशोदाबाई फुसे, संगीताताई फुसे, यशोदाताई दामोदर, सुमनताई ताडे, स्वाती राऊत, कांताबाई बोडखे, मथुरा गोरे, पुष्पाताई दामोदर, इत्यादी महिला व दुर्गा उपस्थित होते.