पोलिसांचा गावठी दारूच्या हातभट्टीवर छापा

प्रतिनिधी संतोष गर्दे
सोयगाव तालुक्यातील पळसखेडा शिवारात गोगडी धरणाच्या पाठीमागे गोगडी नदीच्या काठावर अवैधरीत्या
गावठी दारूची निर्मिती करणाऱ्या हातभट्टीवर शुक्रवारी (दि.26) पोलिसांनी छापा टाकला. पोलीसांनी गावठी दारू, दारू पाडण्यासाठी लागणारे रसायन व साहित्य असा एकूण 64000 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला.
किमतीचे 200 लिटर क्षमतेच्या पूर्ण क्षमतेने भरलेल्या निळ्या रंगाच्या 04 टाक्यांमध्ये 800 लिटर गावठी हातभट्टी दारु तयार करण्याचे रसायन प्रति लिटर 80/- रु दराने
2) 2000/- रुपये किंमतीची 20 लिटर क्षमता असलेल्या पुर्ण क्षमतेने भरलेल्या पांढऱ्या रंगाच्या कॅनमध्ये 20 लिटर गावठी हातभट्टीची दारु प्रति लिटर 100/- मुद्देमालजप्त केले.
अवैधरित्या गावठी दारूची निर्मिती करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय साहेबराव शिंदे वय 20 वर्षे रा पळसखेडा ता सोयगाव असे याप्रकरणीगुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. फर्दापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल साबळे, पो.ना नीलेश लोखंडे पो. कॉ योगेश कोळी, यांच्या पथकाने ही कारवाई केली.
