एकही बाधित शेतकरी पंचनामापासून वंचित राहता कामा नये
– आमदारअब्दुल सत्तार
• तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश

प्रतिनिधी संतोष गर्देसोयगाव ( प्रतिनिधी ) दि.23, तालुक्यात गेल्या तीन चार वेळा झालेल्या अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणावर नदी-नाले काठावरील गावे, शेतीपिकांचे आणि रस्ते, पूल बाधित झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने योग्य समन्वय ठेवून तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे पूर्ण करावेत. यामध्ये एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रशासनाला दिले. आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली सोयगाव येथील पंचायत समितीच्या बचत भवन येथे आज अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी बाबत नैसर्गिक आपत्ती आढावा बैठक संपन्न झाली. याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना आमदार अब्दुल सत्तार यांनी सूचित केले.या बैठकीस उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार मनीषा मेने, गटविकास अधिकारी दादाराव आहिरे, नायब तहसीलदार संभाजी देशमुख, तालुका कृषी अधिकारी रमेश गुंडीले, पंचायत समिती कृषी अधिकारी संतोष भालेराव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अजय टाकसाळे, प्रीतम राठोड, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता अशोक शाखावर, शाखा अभियंता दीपक मोगडे, राजेश राजगुरू, जलसंधारण अधिकारी सूर्यकांत निकम, बाल विकास प्रकल्प अधिकारी सुभद्रा सैवर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गीतेश चावडा, पाणी पुरवठा विभागाचे विजय वाघ यांच्यासह शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रभाकर काळे, कृउबा समितीचे संचालक दारासिंग चव्हाण, तालुकाप्रमुख धरमसिंग चव्हाण, शहरप्रमुख संतोष बोडखे, न.प. तील गटनेता अक्षय काळे, कुणाल राजपूत आदिंसह विविध गावातील आजी माजी लोकप्रतिनिधी, नुकसानग्रस्त शेतकरी, विविध विभागाचे अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.