*वाकोद जैन विद्यालयात जैन उद्योग समूहाकडून शैक्षणिक साहित्य व सायकल वाटप*

प्रतिनिधी संतोष गर्दे
राणीदानजी जैन माध्य. व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्य. विद्यालय, वाकोद ता. जामनेर येथे जैन उद्योग समूह जळगाव चे अध्यक्ष मा. *श्री* *अशोकभाऊ जैन* यांनी आपले वडील डॉ *.पद्मश्री श्री* *श्रद्धेय भवरलाल भाऊ जैन* यांचा सामाजिक व शैक्षणिक वारसा जोपासत विद्यालयातील 200 विद्यार्थ्यांना वह्यांचे सेट दरवर्षी प्रमाणे या वर्षीही वाटप करण्यात आले. तसेच विद्यालयातील एन एम एम एस परीक्षेत जिल्ह्यातून (एन टी संवर्गातून)प्रथम आलेल्या कुमारी प्रिती भरत नप्ते या विद्यार्थिनीस सामाजिक बांधिलकी जोपासत बाहेरगावा वरून ये-जा करण्यासाठी जैन उद्योग समूहाचे शिक्षण विभाग प्रमुख *मा . श्री अतुलभाऊ* *जैन* यांच्या संकल्पनेतून सायकल भेट देण्यात आली या कार्यक्रमासाठी जैन उद्योग समूहाचे प्रतिनिधी म्हणून जैन फार्म वाकोद चे व्यवस्थापक *मा.श्री विनोदसिंहजी राजपूतसाहेब* यांच्या हस्ते वितरित करण्यात आले याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस.टी. चिंचोले, पर्यवेक्षक श्री एन. टी. पाटील, सर्व शिक्षक – शिक्षकेतर बंधू-भगिनी वसतीगृह अधीक्षक यांनी जैन उद्योग समूहाचे आभार व्यक्त केले.