*पोळ्यानिमित्त रुग्णवाहिकेचे केले पुजन*

प्रतिनिधी संतोष गर्दे

फर्दापूर- दि. 22 रोजी फर्दापूर पोलीस स्टेशन मध्ये पोळा सणाचे औचित्य साधत आज जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान, नाणिज धाम यांच्या वतीने देण्यात आलेल्या मोफत रुग्णवाहिकेचे पुजन पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.प्रफुल्ल साबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, श्री अनंत विभूषित जगद्गुरू श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संस्थानातर्फे मोफत रुग्णवाहिका अजिंठा घाटातील अपघात ग्रस्त नागरिकांना सेवा प्रदान करण्याचे काम गेल्या 18 महिन्यांपासून सातत्याने करत आहे. आणि या कालावधीत जवळपास आतापर्यंत 96 अपघातग्रस्त नागरिकांना वेळेवर रुग्णालयात उपचारासाठी पोहचवून त्यांचे प्राण वाचवले आहे.त्याबद्दल फर्दापूर पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांनी रुग्णवाहिकेचे पुजन करुन जगदगुरु श्री.नरेंद्राचार्यजी महाराज यांचे आभार मानून यापुढेही अशीच रुग्णसेवा आपल्या संस्थेच्या माध्यमातून घडत राहो यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या सह माजी उप सरपंच फेरोज पठाण शेख हक्कानी इब्राहिम खान ड्राइवर काशिनाथ नरोटे दीपक नरोटे व फर्दापूर पोलीस ठाण्याचे इतर पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते.