छ
त्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पळसखेडा येथे थाटामाटात उत्साहात साजरी……पळसखेडा तालुका सोयगाव प्रतिनिधी….. संतोष गर्दे सालाबादप्रमाणे यावर्षीही पळसखेडा येथे अति उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी अगोदर सर्व शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी श्री राम मंदिर येथे सर्व एकत्र जमा होऊन पालखीचे नियोजन केले व ढोल ताशा लेझीम पथकासह संपूर्ण गावांमध्ये पालखीची मिरवणूक काढून जागोजागी महिलांनी घरातून महाराजांना आरती ओवाळून पूजा केली व यावेळी वाकोदतील साईभक्त मंडळी यांनीही या मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन आपले योगदान दिले. सर्वांनी संध्याकाळी सात वाजता परत श्रीराम मंदिराजवळ येऊन महाराजांची आरती करून महाप्रसादाचा कार्यक्रम हे ठेवलेला होता. यावेळी गावचे पोलीस पाटील सरपंच ग्रामस्थ व पत्रकार सर्वांनी सहभाग घेतलेला होता.
