. कै.नफिसा बेगम यांच्या निधनानिमित्त रंगनाथ नाना काळे यांची आमदार अब्दुल सत्तार यांना सांत्वन भेट..
….
सोयगाव / ता..
प्रतिनिधी.. संतोष गर्दे…
….
सिल्लोड–सोयगाव विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नी व माजी नगराध्यक्षा सिल्लोड कै. नफिसा बेगम अब्दुल सत्तार यांच्या दुःखद निधनाच्या पार्श्वभूमीवर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रंगनाथ नाना काळे यांनी सत्तार यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट दिली.
यावेळी रंगनाथ नाना काळे यांनी सत्तार कुटुंबीयांची भेट घेऊन “आमचे संपूर्ण काळे कुटुंब आपल्या दुःखात सहभागी आहे,” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. दीर्घकाळाच्या मैत्रीचे स्मरण करत दोन्ही नेत्यांनी जुने प्रसंग आठवले. या भावनिक क्षणी उपस्थित कार्यकर्तेही भावूक झाले.
या प्रसंगी श्री. रवींद्र काळे, श्री. कृष्णा पाटील, श्री. दीपक देशमुख, श्री. अंकुश पगारे, श्री. सुभाष (मामा) चौधरी, श्री. विशाल काळे आदी उपस्थित होते.
